श्री सुधीर करंदीकर
विविधा
☆ “सिक्रेट ऑफ हॅपिनेस” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
असं म्हणतात, “There is only one Happiness in this life, to love and be loved. Love is the master key that opens the gates of happiness.”
आणि या करता जरुरी आहे – स्वतः वर प्रेम करण्यापासून सुरुवात करण्याची. स्वतः वर प्रेम करणारी व्यक्तीच सभोवतालावर प्रेम करू शकते आणि आनंद निर्माण करू शकते. Love yourself first, and everything else falls into line.
* * * *
आजच्या जगात सगळं काही मिळतं, पण आनंद मिळत नाही, असं म्हणतात. कारण आनंद हा कुठल्याही भौतिक वस्तुपासून मिळवता येत नसतो, तर तो माणसांपासूनच मिळवावा लागतो.
आपल्या आसपास माणसं खूप असतात, पण म्हणावं असं किंवा जवळचं असं, आपलं कुणीच नसतं. आणि हीच जवळ जवळ सगळ्यांचीच खंत असते. जवळची माणसं का नाहीत ? तर खरं प्रेम किंवा मनापासून प्रेम हे कुणी कुणावर करतच नाही किंवा असे प्रेम करणारे फारच थोडे थोडके असतात.
नवरा बायको राहतात एका घरात, पण relations dry असतात. आई वडील – मुलं /सुना – नातवंडं राहतात एका घरात, पण relations dry असतात. शेजारी – पाजारी राहतात आसपास, पण relations dry असतात.
ह्या सगळ्यांना जवळ करण्याकरता जरुरी असते, मनापासूनचे प्रेम किंवा सच्चे दिलसे प्यार किंवा इनर लव्ह यांची.
देव आपल्या सगळ्यांना इथे पाठवतांना आपल्या मनावर प्रेमाचे कपडे घालूनच पाठवत असतो. आणि तेच प्रेमाचे कपडे आपण सगळ्यांनीच आयुष्यभर आपल्या मनावर ठेवावे आणि मिळालेलं आयुष्य आनंदात घालवावं, अशी त्याची मनापासून इच्छा असते आणि त्याचे तसे आशीर्वाद पण आपल्यामागे असतात. लहान असतांना आपल्या मनावर तेच कपडे असतात, त्यामुळे सगळ्यांचेच बालपण आनंदानी भरलेलं असतं.
आपण सगळेच थोडे मोठे झालो, कि आपल्यामधला “मी” जागा होतो. हे माझे / ते माझे आणि थोडक्यात म्हणजे सगळेच आपल्यामधल्या त्या “मी” ला पाहिजे असते. आणि मग ते मिळवण्याकरता निरनिराळे मार्ग शोधणे सुरु होते, धावपळ सुरु होते. मोह – माया – मत्सर – राग – लोभ – द्वेष हे आपले मित्र बनतात. आणि इथेच आपल्या आयुष्याचे सगळे गणितच बदलते. देवानी दिलेल्या प्रेमाच्या कपड्यांवर आपण “मी” चे कपडे चढवतो. आणि देवानी दिलेले प्रेमाचे कपडे दफन होतात. बऱ्याच वेळा खोटं किंवा नाटकी प्रेम यांना पण आपण जवळ करतो. प्रेमामधे खरं प्रेम आणि खोटं प्रेम किंवा नाटकी प्रेम असे दोन प्रकार असतात.
खरं प्रेम बघायला मिळतं, प्रेमी / प्रेमिका यांच्यामधे.
खरं प्रेम बघायला मिळतं, शाळा / कॉलेज चे मित्र – मैत्रिणी यांच्यामधे.
खरं प्रेम बघायला मिळतं, मुलं लहान असेपर्यंत आई / वडील आणि मुलं यांच्यामधे.
खरं प्रेम बघायला मिळतं, बहीण – भावंडांमध्ये ते शाळा – कॉलेज मध्ये शिकत आहेत तोपर्यंत किंवा त्यांची लग्ने होईपर्यंत.
लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल त्याला लागते. आपल्या बायकोनी काय करावं / कसं वागावं, वगैरे अशी अपेक्षांची यादी नवरेमंडळीची तयार असते. शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींना हे पसंत पडत नाही आणि पडू पण नये. आपल्या नवऱ्यानी कसे वागावे / काय करावे अशा याद्या बायकोच्या पण तयार असतात. अशा अपेक्षांची आमने- सामने बहुतेक घरांमध्ये होते. आणि मग दोघांमधे नाराजी / बेबनाव / चिडचिड अशी यादी सुरु होते आणि अशा फॅमिली लाईफला आपण संसाराचा गाडा ओढणे असे म्हणतो. आपल्या आधीच्या पिढीमध्ये मुली शिकलेल्या नसायच्या आणि पती परमेश्वर हि संकल्पना त्यांच्या मनात वडीलधाऱ्यांनी रुजवलेली असायची, त्यामुळे आपले मन मारून नवऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे बायका वागायच्या आणि संसाराचा गाडा तसा पुढे जात राहायचा.
“जो तुमको हो पसंद, वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे “, असा विचार करणारे पण नवरा-बायको असतात. “प्यार मे अपना कब्जा दिया जाता है, ना कि दुसरेका कब्जा लिया जाता है”, अशी विचारसरणी असणारे पण नवरा-बायको असतात आणि आहेत. त्यांच्यामधल्या प्रेमाला conditions apply असे लेबल नसते, हे सरळच आहे.
लग्न झाल्यानंतरची मुलं आणि त्यांचे आई वडील / लग्न झालेले भाऊभाऊ / लग्न झालेले भाऊबहीण / लग्न झालेल्या बहिणी यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल इथे पण लागलेले असते. आईवडिलांची जबाबदारी पडणे, त्यांची उपयुक्तता संपणे, आई वडिलांच्या संपत्तीचे वाटप, अशा घटना या नात्यांमध्ये वरवर दिसणाऱ्या प्रेमाचा कमकुवतपणा उजेडात आणतात आणि प्रेमामधल्या conditions apply चा अर्थ पण उघड होतो.
राधा कृष्ण, कृष्ण द्रौपदी, श्रावणबाळ, राम लक्ष्मण भरत, अशी उदाहरणे आज पण बघायला मिळतातच, पण खूप थोडी थोडकी. खरं प्रेम म्हणजे Unconditional Love. खरं प्रेम म्हणजे No Expectations. खरं प्रेम म्हणजे It Is Only Giving and Giving.
ढाई अक्षर ‘प्रेम’ के, सारा जग जितवाये I
ढाई अक्षर ‘प्यार’ के, सबको पास खिचवाये I
ढाई अक्षर ‘लव्ह’ के, सब को गले मिलवाये I
आणि ही “ ढाई अक्षरं ” ज्यांना आचरणात उतरवता येतात,
त्यांच्याकरता see the after effect – – –
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈