(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी द्वारा श्री गणेश चतुर्थी पर्व पर रचित एक प्रार्थना . भाद्रपद एक पवित्र माह है और इस माह प्रत्येक घरों में श्री गणेश जी का आगमन होता है . श्री गणेश जी बुद्धि के देवता तो हैं ही साथ ही वे अपने भक्तों की चिंता भी करते हैं और संकटमोचन तो हैं ही.
उनके ही शब्दों में –
भाद्रपद हा खुप पुनित पावन महिना आहे, घरो घरी श्रीगणेशा चे आगमन होते!
गणपती ही बुद्धीची देवता तर आहेच पण संकट निवारण करणारा हा देव भक्तांचा विशेष आवडता देव आहे!
१९८५ साली लिहिलेली ही गणेशाची प्रार्थना—
☆ प्रार्थना ☆
विनायका, हे श्रीगणेशा दया कर देवा
आलो आम्ही तव चरणाशी आशीर्वाद द्यावा
मंगलमय हे रूप मनोहर,
माता गिरीजा, पिता शंकर
तुझ्या दर्शने विघ्ने टळतील
नामस्मरणे संकटे पळतील!
हे हेरंबा मयूरेश्वर ओंकार,
आमची आराधना स्वीकार!
जास्वंदी ही लाल तांबडी, हिरवी दुर्वांकुरे,
आणले भावभक्तीचे हारतुरे!
श्रद्धेच्या स्नेहाने तेवती नयनांची निरांजने,
तुझ्या दर्शना आतुरली आमची मने!
दर्शन देऊन पावन करावे,
सर्वार्थाने आम्हा रक्षावे,
हीच एक प्रार्थना,
तुझ्या चरणी गजानना!
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
धन्यवाद हेमंतजी, सर्वांचे आभार, गणेश चतुर्थी च्या शुभकामना!