मराठी साहित्य – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प बावीस # 22 ☆ साहित्य संवर्धनात मोबाईलचे योगदान ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं। आज प्रस्तुत है श्री विजय जी की एक भावप्रवण कविता “सागर सरीता मिलन – क्षण मिलनाचे ”। आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। )
☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प बावीस # 22 ☆
☆ साहित्य संवर्धनात मोबाईलचे योगदान ☆
सद्य परिस्थितीत माणूस माणसापासून मनाने दुरावत चालला आहे. त्याला औपचारिक रित्या जोडून ठेवण्याचे महत्वाचे कार्य मोबाईल करतो आहे. जे प्रत्यक्ष भेटीत बोलता येत नाही ते काम सामंजस्यानं ज्ञानवर्धक ससंदेशवहनातून मोबाईल सातत्याने करीत आहे. मदतीचा हात म्हणून मोलाची भूमिका मोबाईल पार पाडीतआहे . दैनंदिन लेखन कला व्यासंग जोपासताना नोकरी, व्यवसाय, सर्व जबाबदाऱ्या पार पडतांना अनेक प्रकारे विविध माध्यमातून हा मोबाइल गुरू, मित्र, प्रचारक, प्रसारक या भूमिकेतून मोबाईल व्यासंग वाढविण्यात उपयोगी ठरतो.
नित्य लेखन करणारे मोबाईल द्वारे समाजात आपले साहित्य प्रसारित करीत आहेत. मोबाईल, व्हाट्सएप, फेसबुक आणि सोशल मिडिया तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला सिद्ध करीत आहे.
इतरांचे विविध विचार मत प्रवाह संग्रहीत करून त्यातून कलाव्यासंग जोपासण्याची आणि आवश्यक ते ज्ञान मिळवण्याची सेवा संधी मोबाईल मुळे मिळाली आहे.
साहित्यिक ग्रुपची महत्वपूर्ण वैचारीक देवाण घेवाण आणि लेखन प्रगती, कवितेचा प्रचार आणि प्रसार करण्यात मोबाईल ने उच्चांक गाठला आहे. साहित्यिकांना आवश्यकता आहे.
सोशल नेटवर्किंग साईट वर सर्व साहित्यिकांच्या मुलाखती, विविध नवे जुने काव्य प्रकार मोबाईल मधून वाचायला, लिहायला मिळतात. त्यातून रसिक वाचक, साहित्यिक यांचे अतूट स्नेहबंधन निर्माण होते.
अनेक स्पर्धा, उपक्रम यात सहभागी होण्याचे भाग्य केवळ मोबाईल मुळे मिळते. कलावंतांचे कलागुण व अंगी असलेल्या साहित्य गुणांना, त्यांच्या विचारांना नाव, गाव, वाव आणि भाव देण्याचे महत्त्व पूर्ण कार्य मोबाईल करत आहे.
लेखन करायचे म्हटले की अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. पण मोबाईल मुळे फार काही विनासायास घडत आहे. मोबाईल अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा आरसा आहे. याच्यात डोकावणारे काळाचे भान विसरून जातात. पण संयमाची कळ त्यांना हवे ते मिळवण्याचा अनुभव आणि संधी उपलब्ध करून देते. मोबाईल खळाळणारी नदी. मोबाईल घनगर्द अंबराई. मोबाईल एक नयनमनोहर शब्द चित्र, रेखाचित्र, भावदर्पण आणि बरेच काही. . . . !
समाज पारावरून मोबाईल हा विषय आता केवळ टिकेचे लक्ष्य नसून साहित्य संवर्धन करणारे प्रभावी माध्यम ठरला आहे.
असा हा जिव्हाळ्याचा विषय अतिरेक केला तर व्यसन आणि प्रसंगी शापही ठरू शकतो. हा धोका टाळायचा कसा हे देखिल मोबाईल च शिकवतो. कुणाशी काय, कधी, कसे किती बोलायचे याचे अनुभव प्रचुर धडे मोबाईल क्षणोक्षणी देत रहातो. माणूस सुजाण करण्यात मोबाईल यशस्वी झाला आहे.
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.