कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  व्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।  आज प्रस्तुत है श्री विजय जी की एक  भावप्रवण कविता  “समर्पित. . . . !”।  आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

☆ समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ ☆ पुष्प  पंचवीस # 25 ☆

☆ समर्पित. . . . !☆

 

आधी होता वानर

मग झाला नर.

कधी सुर तर कधी  असूर

कधी यक्ष तर कधी किन्नर.

माणसा ही सारी तुझीच रूप.

तुला जन्मजात मती लाभलेली.

तू आर्य, तर कधी  अनार्य

टोळ्याटोळ्यातून रहाताना

घातलेस स्वतःला जातीचे कुंपण.

तू कधी संत,कधी महंत

कधी राजा,तर कधी, महाराजा

कधी  राष्ट्रपुरुष ,तर

कधी समाज पुरूष .

स्वतः घडलास

देश घडवलास.

ज्ञानी झालास

शिक्षणाचा प्रसार केलास.

कलेतून  आकारत गेलास

क्रिडेतून साकारत गेला

ज्ञानातून जगत गेलास

माणसा  तू  सतत

संस्कारातून शिकत गेला.

कार्य कर्तृत्व घडवीत गेला.

पद, पैसा,  प्रसिद्धी

क्षणोक्षणी जोडत गेला .

नी पैसा पैसा जोडताना

माणूस पण हरवीत गेला.

माणसानच आणली लोकशाही

लोकांनी लोकांसाठी. . .

आपलाच माणूस निवडून दिला

आपल्याला लोक ठरवून

लोकसत्ताक प्रतिनिधी झाला.

माणसा  अजूनही हव्या आहेत

मुलभूत गरजा, जगण्यासाठी.

आज स्वातंत्र्यानंतरही.. .

इथलं *बाई माणूस* सहन करत

अन्याय, अत्याचार,  बलात्कार.

इथ माणूस सुरक्षित हवाय

की  आरक्षित

प्रश्न आहे  अनुत्तरीत.

माणूस. . . माणूस. ..माणूस

माणूस  असा?

माणूस तसा ?

उत्तर नको प्रश्नांकीत. . !

माझीच कविता

माझ्यातल्या माणसाला समर्पित. . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments