मराठी साहित्य – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प चौदावा # 14 ☆ सिग्नलवरचा भारत ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।   आज श्री विजय जी ने एक गंभीर विषय “सिग्नल का भारत” चुना है।  हम प्रतिदिन सिग्नल पर जी रही दुनिया और लोगों को देखते हैं किन्तु, न तो हम उन लोगों के लिए कुछ विचार करते हैं और न ही शासन।  ऐसे ही  गंभीर विषयों पर आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प चौदावा # 14 ☆

 

☆ सिग्नलवरचा भारत ☆

 

दारिद्रय रेषेखालील जनता म्हणजे हा  सिग्नलवरचा भारत.  ज्यांना  अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा देखील स्वायत्त तेने भागवता येत नाहीत  अशी कुटुंबे. भीक मागणारी मुले म्हणून त्यांची उपेक्षा होत रहाते. फुटपाथ वर पथारी पसरून किंवा  एखाद्या झाडाच्या  आडोश्याने यांचा संसार सुरू होतो. असे  बेघर जगणे आणि यातून जन्माला येणारी नवी पिढी,  जीवन संघर्ष करताना व्यसनाधीन  आणि गुंडगिरी याकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे

सिग्नलवर राहणाऱ्या लोकांच्या समस्या सामाजिक व्यवस्थेशी झगडा करीत  समाघास घातक ठरत आहेत. जीवनाश्यक मुलभूत गरजा,  शिक्षण,  संस्कार  यांचा अभाव, पुरेश्या सेवा  सुविधा उपलब्ध नसताना, उघड्यावर थाटलेले संसार  प्रदुषण,  दैन्य,  चोरी मारी यांना खतपाणी देताना दिसतात.

प्रथमत: सर्व दारिद्रय रेषेखालील लोकांना रोजगार  उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका स्तरावर विशेष  उपाय योजना राबविण्यात यायला हव्यात. रस्त्यावर बेवारसपणे फिरणारे हे लोक यांची ठोस व्यवस्था व्हायला हवी.  भीक मागून जगायचे  आणि पुरेशी भीक मिळाली नाही की चोरी करायची ही वृत्ती  बळावत चालली आहे.

रोजगार निर्मिती  आणि मुलभूत गरजा  उपलब्ध करून दिल्यास हा समाज  उपेक्षित रहाणार नाही.   फुटाथवर राहणाऱ्या लोकांसाठी स्वत:चा हक्कांचे घर मिळेल. उघड्यावर मांडलेला संसार त्यांना स्वतःच्या पायावर उभे  करेल.  शिक्षण मोफत  आणि विशिष्ट ठिकाणी  अशा लोकांना निवारा  उपलब्ध करून दिल्यास सार्वजनिक ठिकाणी होणारे दैन्य प्रदर्शन  आपोआप थांबेल.  भीक मागायला मनाई करून  रोजगार उपलब्ध करून दिल्यास बरेच परीवर्तन घडून येईल.

सिग्नलवरील  अनाथ मुलांस अनाथश्रम तसेच  अंध, वृद्ध अपंगांना  महापालिकेने विशिष्ट ठिकाणी आसरा द्यायला हवा.  सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने त्यांना विशेष सेवा उपलब्ध करून देता येईल.   ज्यांना मुलेबाळ नाही अशा  सधन कुटुंबातील व्यक्तींनी  अशी मुले  दत्तक घेतल्यास हे  मागासलेपण दूर होईल.

माणसाने माणसाला मदतीचा हात देऊन त्यांचा सांभाळ करणे उत्तम शिक्षण व संस्काराची प्रेरणा अंतरी रुजवणे  गरजेचे  झाले आहे. भीक देणे बंद केले की माणूस  आपोआप रोजगार शोधून स्वतःच्या  उदरनिर्वाहचे साधन शोधेल. काम करणा-या व्यक्तीला मदत करणे गैर नाही पण भिकारी जमात पोसणे हे मात्र पाप आहे.

प्रत्येक व्यक्तीस  तो निराधार नाही,  भिकारी नाही,  माणूस  आहे,  भारतीय नागरिक  आहे ही जाणीव करून दिल्यास ती व्यक्ती स्वतःचे आयुष्य  मार्गी लावू शकेल. सदर व्यक्ती रोजगार निर्मिती करेपर्यंत मुलभूत सेवा सुविधा दिल्यास ती व्यक्ति  समाजात स्वतःचे स्वतंत्र  अस्तित्व निर्माण करू शकेल.

भीक मागण्या पेक्षा भीक देणे हा  गुन्हा आहे  ही भावना मनात ठेऊन केलेली मदत सेवा कार्य  खूप मोलाचे ठरेल.  धडधाकट व्यक्तीला कष्टाची कामे करायला लावून  अर्थार्जन  उपलब्ध करून दिल्यास  भीकारी संख्या कमी होईल.  जेंव्हा भीक देणे बंद होईल तेव्हाच ही जमात  स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे राहिल.

शेवटी  व्यक्ती घडली की कुटुंब घडते. कुटुंब घडले की समाज सुधारतो,  समाज घडला की देशाची प्रगती होते हे सत्य विसरून चालणार नाही.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.