मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ समाजपारावर एक विसावा…. !#1 – पुष्प पहिले …. ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।  कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए कविराज विजय जी ने यह साप्ताहिक स्तम्भ “समाजपारावर एक विसावा…. !” शीर्षक से लिखने के लिए  हमारेआग्रह को स्वीकार किया, इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प पहिले ….”

☆ साप्ताहिक स्तम्भ – समाजपारावर एक विसावा #-1 ☆

 ☆ पुष्प पहिले .. .  ☆

समाज पारावर माणूस माणसाला भेटतो. माणसाचे अंतरंग  उलगडून  एक समाज स्पंदन वेचण्याचा अनोखा प्रयत्न या स्तंभलेखनातून  करणार आहे संवादी माध्यमातून सोशल नेटवर्किंग साईट वरुन वैचारिक देवाणघेवाण होत आहे.

*अक्षरलेणी* या कवितासंग्रहाच्या  दोन यशस्वी  आवृत

माणूस माणसाला घडवतो,  बिघडवतो आणि सोबत घेऊन  अनेक विकासकामे करू शकतो. प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगवेगळे असतात. विचार पटले की संवाद घडतो. संवादातून नियोजन आखणी केली जाते.  कार्य कौटुंबिक  असो, सांस्कृतिक  असो,  साहित्यिक  असो परस्परांशी साधलेला संवाद महत्वाचा ठरतो.

हा संवाद व्यक्तीशी संस्कारीत जडण घडण त्याला जीवन प्रवासात नवनवीन वाटा उपलब्ध करून देतो. समाज प्रियतेच किंवा समाजाभिमुख रहाण्याच वरदान माणसाला जन्मजात लाभले आहे.

समाज समाज म्हणजे नेमके काय?  समाज म्हणजे कोणतीही जात नव्हे,  कोणताही पंथ नव्हे. व्यक्ती स जन्म देणारे त्याचे आई वडील हा पहिला समाज.

बालपणात संपर्कात  आलेले समवयस्क सवंगडी,  शाळू सोबती हा दुसरा समाज,  जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर ज्ञानदान करणारे गुरूजन हा तिसरा समाज,  बालपण, तारूण्य, वृद्धावस्था यात सुखदुःखात सामिल होणारा चौथा समाज,  आणि  आपल्या कार्यकर्तृत्वाच्या प्रभावाने प्रेरित होऊन त्याचे बरे वाईट परिणाम भोगणारा  पाचवा समाज माणसाला सतत जाणीव करून देतो. तो माणूस  असल्याची.

माणसाचं माणूसपण त्याच्या आचारविचारात, दैनंदिन लेखन कला व्यासंगात,त्याच्या कार्य कर्तृत्वात आणि माणसाने माणसावर ठेवलेल्या विश्वासात अवलंबून असते. हा विश्वास माणसाला धरून रहातो तेव्हा तो माणूस समाजप्रिय होतो. समाज प्रिय माणसे जीवनात यशस्वी झाली की आपोआप समाजाभिमुख होतात. हा समाज तेव्हा माणसाला नवा विचार देतो. विचारांची दिशा त्याला कार्यप्रवण ठेवते. त्याच्या या जीवनप्रवात कुठे तरी आपले माणूस सोबत  असावेसे वाटते.

ही सोबत, हा विसावा  शब्दातून, अक्षरातून, विचारातून, मार्गदर्शनातून  ,प्रोत्साहनातून मनाला जेव्हा मिळते ना तेव्हा ही  अनुभवांची  शिदोरी माणसाला वैचारिक मेजवानी देते. एक निर्भेळ आनंद देते.  हे वैचारिक  खाद्य माणसाला आयुष्यभर पुरते.  त्याचा जीवनप्रवास समृद्ध  करते.  हा विसावा ही वैचारिक बैठक वेगवेगळ्या जीवनानुभुतीतून माणसाला विसावा देते. जगायचे कसे? याचे उत्तर देखील या पारावर सहजगत्या उपलब्ध होते.

माणूस जेव्हा माणसाच्या संपर्कात येतो ना  तेव्हा तो  ख-या अर्थाने विकसित होतो. त्याचे हे विकसन त्याला जगाची सफर घडवून  आणते.  कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे जगायला शिकवते. मान, पान, पद, पैसा ,  प्रतिष्ठा मिळवून देण्याचा राजमार्ग याच समाजपाराला वळसा घालून जातो.  इथे जगणे आणि जीवन यातला  सुक्ष्म फरक कळतो आणि माणसाचं जीवन प्रवाही बनते. हा जीवनप्रवाह या शब्द पालवीत जेव्हा विसावला तेव्हा नाविन्यपूर्ण  आणि वैविध्यविपूर्ण  आशय ,विषयांची लेखमाला  आकारास  आली हा विसावा रंजनातून सृजनाकडे वळतो तेव्हा हाच माणूस  माणसाला विचारांचे दान देतो. मानाचे पान देतो. हे  आठवणींचे पान समाज पारावर  रेंगाळते आणि

माणूस माणसाशी जोडला जातो.  हे  एकत्रीकरण,  हे  समाज सक्षमीकरण,  अभिव्यक्ती परीवाराशी या लेखमालेतून संलग्न झाले  आणि  विविध विषयांवरील लेख रसिक सेवेत दाखल  झाले. विविध विषयांवर लेख या लेखमालेतून देणार आहे. हे लेख केवळ  शब्द बंबाळ आलेख नव्हे तर हा  आहे. समाजपार. ह्रदयाचा परीघ. वास्तवाचा  आरसा  आणि शब्दांचे  आलय. . .

तुमच्या  आमच्या  अभिव्यक्ती साठी.. . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.