मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 19 – अंधार ☆ – श्री सुजित कदम
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! अंधकार में प्रकाश की एक किरण ही काफी है हमारे अंतर्मन में आशा की किरण जगाने के लिए. इस कविता अंधार के लिए पुनः श्री सुजित कदम जी को बधाई. )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #19☆
☆ अंधार ☆
अंधार
माझ्या अंतर्मनात रूजलेला
खोल श्वासात भिनलेला
नसानसात वाहणारा
दारा बाहेर थांबलेला
चार भिंतीत कोडलेला
शांत, भयाण
भुकेलेल्या पिशाच्चा सारखा
पायांच्या नखां पासून केसां पर्यंत
सामावून गेला आहे माझ्यात
आणि बनवू पहात आहे मला
त्याच्याच जगण्याचा
एक भाग म्हणून जोपर्यंत
त्याचे अस्तित्व माझ्या नसानसात
भिनले आहे तोपर्यंत
आणि
जोपर्यंत माझ्या डोळ्यांतून एखादा
प्रकाश झोत माझ्या देहात
प्रवेश करून माझ्या अंतर्मनात
पसरलेला हा अंधार झिडकारून
लावत नाही तोपर्यंत
हा अंधार असाच राहील
एका बंद काजळाच्या डबी सारखा
आतल्या आत गड्द काळा मिट्ट अंधार
एका प्रकाश झोताची वाट पहात
अगदी शेवट पर्यंत…!
© सुजित कदम, पुणे
7276282626