(प्रत्येक भाषा का अपना एक समृद्ध साहित्य होता है। मेरी दृष्टि में एक कवि के लिए सभी भाषाएँ समान होती हैं। कवि का किसी भी भाषा में समर्पित भाव से कविता को उसका क्या योगदान है, यह महत्वपूर्ण है। संभव है मेरे विचारों से सब सहमत न हों। किन्तु, यह प्रश्न अपनी जगह स्वाभाविक है कि कवि का उसकी अपनी मातृभाषा में कविता को क्या योगदान है ? संवेदनशील कवियित्रि सुश्री प्रभा सोनवणे जी की प्रतिष्ठित साहित्य सृजन यात्रा में ऐसे कई पड़ाव आए होंगे। आज प्रस्तुत है उनके साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में “मी मराठी कवितेला काय दिले ? (मैंने मराठी कविता को क्या दिया?)” पर उनकी बेबाक राय। आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं । )
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 2 ☆
☆ मी मराठी कवितेला काय दिले ? ☆
खुप चांगला प्रश्न आहे स्वतःच स्वतःला विचारलेला !
आणि उत्तर ही प्रांजळ पणे देण्याचा प्रयत्न–
कविता मी वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षा पासून लिहितेय !
आठवीत असताना वर्गाच्या हस्तलिखितासाठी एक कथा आणि कविता लिहिली त्या वेळी असं मुळीच वाटलं नाही भविष्यात आपला हात इतका काळ लिहिता राहील !
सासरी माहेरी अजिबात च पोषक वातावरण नसताना कविता टिकून राहिली!
कुठल्याही काव्य मंडळात जायच्या आधी मला छापील प्रसिद्धी भरपूर मिळाली होती,सुरूवातीला मी हिंदी कविता लिहिल्या त्या रेडिओ पत्रिकांमधून प्रकाशित झाल्या!
मी एका बाबतीत खुप भाग्यवान आहे की,माझ्या हिंदी मराठी कवितांना खुप प्रशंसा पत्रे आली आहेत! लोकप्रभा मधे प्रसिद्ध झालेल्या कवितेला महाराष्ट्रातल्या कुठून कुठून सुमारे 40 पत्रे आली होती. त्याआधी रेडिओ पत्रिकेत ल्याही हिंदी कविताना नेपाळ, झुमरीतलैय्या वगैरे ठिकाणाहून पत्रे आली होती!
प्रामाणिक पणे सांगायचं तर मी आत्मलुब्ध व्यक्ती नाही! पण मला खुप प्रशंसा मिळालेली आहे, गजल चा तर मी फार खोलात जाऊन अभ्यास ही केलेला नाही पण गजल नवाज भिमराव पांचाळें च्या संमेलनात ही प्रशंसा मिळाली ! भिमरावांनी सकाळ आणि पुण्य नगरी मधल्या सदरात ही माझ्या गजला निवडल्या आणि त्या वाहवा मिळवून गेल्या!
ज्या काळात क्वालिटी जपणारे संपादक होते त्याकाळात माझ्या कविता मनोरा, स्री, मिळून सा-याजणी, विपुलश्री इ इ मधे प्रकाशित झाल्या आहेत! “फेवरिझम” चा फायदा मी कधीच घेतला नाही! माझ्या कवितेत काही बदल कवी रवींद्र भट यांनी सुचवले होते, तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, “मग ती माझी कविता रहाणार नाही तुमची होईल !” मोडकी तोडकी कशी ही असो माझी ती माझी ! त्या वेळी मी परिषदेचा “उमलते अंकुर” कार्यक्रम नाकारला होता !
मी मराठी कवितेला काय देणार? ती मुळातच खुप संपन्न आहे! पण मराठी कवितेने “स्रीवादी कवयित्री” म्हणून खसखशी एवढी का होईना माझी नोंद घेतली आहे !
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503
Nicely written Raniakka ???
धन्यवाद गं !
धन्यवाद कामिनी
धन्यवाद गं !
Very nice and honest opinion Mrs. Prabha Sonwane.
Thank you very much
माहेरी तसंच सासरीही पोषक वातावरण नसताना तुम्ही तुमच्यातील कविता नुसतीच जगवली नाही तर पूर्णपणे बहरवली. हे वरचं वरदान!
रवींद्र भटांची कवितेत बदल करण्याची सूचना नाकारणं हे त्या कवितेतल्या नैसर्गिकतेला जपण्याचे द्योतक आहे. निर्मितीत प्रामाणिकपणा असला तरच असा अनुनय नाकारण्याची उर्मी येते.
आपण लिहिलं त्यातील प्रांजलपणा शब्दाशब्दात दिसतो. खूप सुंदर??? अभिनंदन???
Very nice
Thank you very much
Thanks to all friends
प्रांजळ विचार आवडले प्रभाताई
धन्यवाद मॅडम
खूप खूप छान लिहिलंस.आवडलं
Being your own is the real art. I appreciate your stand not to accept any change. Your creativity is your own personalty. Keep it up Mam!
Thanks a lot sir