मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #- 22 – तुझे रूप दाता ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। सुश्री रंजना एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं। सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से जुड़ा है एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है। निश्चित ही उनके साहित्य की अपनी एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता – “तुझे रूप दाता ”। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 22☆
☆ तुझे रूप दाता ☆
तुझे रूप दाता स्मरावे किती रे ।
नव्यानेच आता भजावे किती रे।
अहंकार माझा मला साद घाली ।
सदाचार त्याला जपावे किती रे।
नवी रोज स्पर्धा इथे जन्म घेते।
कशाला उगा मी पळावे किती रे ।
नवी रोज दुःखे नव्या रोज व्याधी।
मनालाच माझ्या छळावे किती रे।
कधी हात देई कुणी सावराया।
बहाणेच सारे कळावे किती रे ।
पहा सापळे हे जनी पेरलेले ।
कुणाला कसे पारखावे किती रे।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105