मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ मी_माझी – #28 – ☆ शिक्षण ☆ – सुश्री आरूशी दाते
सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी शिक्षण. सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं. सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। आज का तथ्य शिक्षण! यह सत्य है कि जन्म के प्रारम्भ से ही हम शिक्षा पाने लगते हैं। शुरुआत तो घर से ही होती है न । माँ पिता तो प्रथम कड़ी है फिर सम्पूर्ण जीवन हम सीखते ही रहते हैं कभी शिक्षक से तो कभी आस पास से और अंत में हमें हमारा अनुभव ही जीना सीखा देता है। सुश्री आरूशी जी ने बड़े ही सहज शब्दों में शिक्षण की व्याख्या की है। सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #28 ☆
☆ शिक्षण ☆
जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षणातून शिक्षणाची सुरूवात होते. व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक, हा कयास मनात ठेवून शिक्षण घ्यावे, हो ना !
पण खरंच शिक्षण कधी सुरू होतं? ते कोण देतं? कोणाला देतं? कशासाठी? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात, प्रश्न उभे राहतात म्हणून मग मी हा लेखन प्रपंच करते. उत्तर शोधायचा छोटासा प्रयत्न. नेहमीच उत्तरं मिळतात असं नाही, पण ज्ञानात नक्कीच भर पडते. म्हणजे कुठेतरी शिक्षण घेणे ही प्रक्रिया चालू असते, असं वाटतं.
अगदी तान्हे असतो तेव्हापासून आई बाबा, आजी आजोबा गाणी गाऊन, गोष्टी सांगून खूप काही शिकवत असतात. म्हणून तर आपण हळू हळू बोलायला शिकतो. व्यक्त व्हायला शिकतो, काय हवं जाय नको हे सांगू शकतो. पुढे वयाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षांपासून शाळेत जाऊन अधिकृत रित्या शिक्षण सुरू होतं ते साधारण वयाच्या बावीस पर्यंत चालूच राहते. मुद्दा असा आहे की नक्की काय शिकतो. का फक्त फॅक्टस आणि फिगर्स चा भडिमार असतो? शिक्षक आपलं काम करत असतात, पण आपलं काय काम आहे, ते कधी कधी पटकन समजत नाही. कुठेतरी आत खोल गोंधळ उडालेला असतो, त्यातच गुंतत जातो किंवा मग त्यातून मार्ग काढण्यासाठी धावपळ सुरू होते आणि एका नवीन शिक्षणाला प्रारंभ होतो. डिग्री मिळाली की शिक्षित झालो असा अर्थ सहजरित्या काढला जातो. अर्थात तेही कुठेतरी योग्य आहेच. पण त्यातून उत्तम व्यक्ती घडते का? देश साठी किंवा समाजासाठी आपण देणं लागतो ह्याची मुहूर्तमेढ होते का? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आवश्यक आहे. समाजभान, देशभान ठेवणे तितकेच गरजेचं आहे.
असो, हे झालं घराबाहेरील कर्तृत्व. घरासाठी काय, नातलगांसाठी काय? हे प्रश्न डावलून चालणार नाही, थोडक्यात काय तर प्रपंच डावलून चालणार नाही. इथेही संस्कृतिभान ठेवून योग्य त्या गोष्टी करायची सुबुद्धी ह्या शिक्षणाने मिळू शकते. फक्त आपण शिक्षित व्हायची गरज आहे, अर्थात शिक्षित नाही झालो तर आयुष्य धडे शिकवायला सुरुवात करते आणि योग्य वळणावर आणून सोडते, ही संधी लक्षात घेऊन मार्गक्रमण करावे हेच खरे. अनुभव जे शिकवतात त्यामुळे जीवनाची गाडी जलद चालवायला नक्कीच उपयोग होतो, कारण चुका टाळण्याची प्रगल्भता निर्माण झालेली असते.
ह्या पलीकडे जाऊन परमर्थाकडे गाडी वळवण्याशी इच्छा व्हायला हवी, त्यासाठी सुद्धा गुरूचे आगमन होणे गरजेचे आहे. करण शाश्वताकडे नेणारा रस्ता कधी ही संपणारा नाही असं वाटत असतानाच जीवनाचे सार्थक करण्यासाठी हाच मार्ग अवलंबिला जातो ह्यात नवल नाही.
© आरुशी दाते, पुणे