मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 25 – घर बदलताना ….☆ – सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी एक कविता “घर बदलताना ….”. सुश्री प्रभा जी की कविता की एक एक पंक्तियाँ हमें एक चलचित्र का अहसास देती हैं। यह सच है अक्सर युवती ही पदार्पण करती है अपने नए घर में । फिर एक एक क्षण बन जाता है इतिहास जो स्मृति स्वरुप आजीवन साथ रहता है अश्रुपूरित उस घर को बदलते तक। या तो घर बदलता है जिसमें हम रहते हैं या फिर शरीर जिसमें हमारी आत्मा रहती है। अतिसुन्दर रचना एक मधुर स्मृति की तरह संजो कर रखने लायक। मैं यह लिखना नहीं भूलता कि सुश्री प्रभा जी की कवितायें इतनी हृदयस्पर्शी होती हैं कि- कलम उनकी सम्माननीय रचनाओं पर या तो लिखे बिना बढ़ नहीं पाती अथवा निःशब्द हो जाती हैं। सुश्री प्रभा जी की कलम को पुनः नमन।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 24 ☆
☆ घर बदलताना …. ☆
खुप आठवणी आहेत गं
या घराच्या !
इथेच तर सुरू झाला
नवा संसार –
उंबठ्यावरचं माप ओलांडून
आले या घरात तेव्हा-
कुठे ठाऊक होते ??
पुढे काय वाढून ठेवलंय
ताटात !!
“हक्काचं छप्पर ” एवढीच
ओळख नाही या घराची !!
केवढा मोठा कालखंड काढलाय याच्या कुशीत ?
पूजाअर्चा, तुळशीला पाणी घालणं,दारात रांगोळी रेखणं पाहिलंय!
कांकणाची कीणकीण पैंजणाची छुनछुन ,सारं ऐकलंय या घरानं !
बदलत गेलेली प्रतिमा पाहिली
आहे !
उंबरठा ओलांडताना झालेली
घालमेल पाहिली आहे !
तोलून धरली आहेत यानंच ,
कित्येक वादळं ,
ऐकले आहेत वाद विवाद आणि वादंग !
सोसले आहेत पसारे –
कागदा -कपड्यांचे ,
अस्ताव्यस्त बेशिस्तपणाचे
शिक्के ही बसले आहेत !
तरी ही इतक्या वर्षाच्या सहवासाचे बंध जखडून ठेवताहेत !
मनाच्या टाईम मशिन मधे जाऊन अनुभवतेय ते जुने पुराणे क्षण ….
सोडून ही वास्तु नव्या घरात ,जाताना आठवतंय सारं भलं बुरं !
जुनंपानं फेकून देताना
हाताशी येतंय काही हरवलेलं !
जुनं घर सोडताना दाटून येतंय मनात बरचं काही !
खुप आठवणी आहेत गं
या घराच्या !!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]