मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 24 – बरं आहे मना तुझं… ☆ – श्री सुजित कदम
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर कविता बरं आहे मना तुझं… )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #24☆
☆ बरं आहे मना तुझं… ☆
बरं आहे मना तुझं
सदा राही रूबाबात
ताबा घेऊनीया माझा
राही तिच्या घरट्यात. . . . !
बरं आहे मना तुझं
जमे हासू आणि आसू
कधी इथे, कधी तिथे
आठवांचे रंग फासू . . . !
बरं आहे मना तुझं
खर्च नाही तुला काही
अन्न पाण्या वाचूनीया
तुझे अडते ना काही .. . !
बरं आहे मना तुझं
माझी खातोस भाकरी
माझ्या घरात राहून
तिची करशी चाकरी. . . !
बरं आहे मना तुझं
असं तिच्यात गुंतण
ठेच लागताच मला
तिच्या डोळ्यात झरणं.. . !
© सुजित कदम, पुणे
7276282626