मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #26 – मेघ भक्तीचा ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “मेघ भक्तीचा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 26 ☆
☆ मेघ भक्तीचा ☆
कृष्ण डोह हा सावळा
राधा उतरली आत
ठाव घेताना डोहाचा
सारी सरली ही रात
वीणा चिपळ्या सोबती
मेघ भक्तीचा बरसे
गाभाऱ्यात तेवणारी
मीरा तेजोमय वात
राधा सत्ययुगातली
कलियुगातली मीरा
तरी सवतीचा खेळ
चाले अजून दोघीत
नागवेलीचं हे पान
वाटे नागिणीचा फणा
फास झाडाच्या भोवती
तिनं टाकलेली कात
वन सारं बासरीचं
तिच्या सोबती नाचतं
धून राधेच्या प्राणाची
नित्य वाजे बासरीत
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८