(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प दुसरा – पर्यावरण नाते ….!” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प दुसरा #-2 ☆
?? पर्यावरण नाते. ….! ??
व्यक्ती आणि निसर्गाचे, नाते कळी नी फुलांचे .
कधी होई पारिजात, कधी पुष्प बकुळीचे . . . !
एका एका बिजापोटी, कुणी सर्वस्व वाहते.
कळी मरता मरता, तिथे फूल जन्मा येते.
अन्न, वस्त्र, निवार्याचा , निसर्गाने दिला हात.
दान द्यावे, दान घ्यावे, रूजविले अंतरात. . . . !
जीवनाच्या वावरात, सुखदुःख रेलचेल.
होई मौसमी वार्याने, उरामध्ये घालमेल. . . . !
रंग ढंग जीवनाचे, दुःख, दैन्य सहायचे.
मातीतून जन्मायाचे,मातीमध्ये मरायचे. . . . !
व्यक्ती आणि निसर्गाची, वाट चुकलेली वारी
जीवनाच्या फांदीसवे, घेती आकाश भरारी. . . . !
कधी वास्तवाचे जग, कधी नभ कल्पनेचे.
होई काळीज कागद, सूत जुळता दोघांचे. . . !
पाणी अडवा, जिरवा, झाडे लावा नी जगवा
समतोल सांभाळाया,नाते नाजूक फुलवा. . . . !
आसवांची झाली शाई, होता नात्यांची पेरण .
वसुंधरेच्या भाळाला,भावफुलांचे तोरण. . . !
कळी काय, फूल काय,एकमेकां जपायचे
पर्यावरणीय मेळ,सांधताना फुलायचे. . . !
✒ © विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.