मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 27 – गोष्ट..! ☆ – श्री सुजित कदम
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर कविता गोष्ट..! )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #27☆
☆ गोष्ट..! ☆
माझा बाप
माझ्या लेकरांना मांडीवर घेऊन
गावकडच्या शेतातल्या खूप गोष्टी सांगतो..
तेव्हा माझी लेकरं
माझ्या बापाकड हट्ट करतात
राजा राणीची नाहीतर परीची
गोष्ट सांगा म्हणून तेव्हा..
बाप माझ्याकडं आणि मी बापाकड
एकटक पहात राहतो
मला…
कळत नाही लेकरांना
कसं सांगाव
की राजा राणीची आणि परीची
गोष्ट सांगायला
माझ्या बापान कधी अशी स्वप्न
पाहिलीच नाहीत..,
त्यान..
स्वप्न पाहिली ती फक्त..
शेतातल्या मातीची
पेरणीनंतरच्या पावसाची..,
त्याच्या लेखी
नांगर म्हणजेच राजा
अन् माती म्हणजेच राणी
मातीत डोलणारी पिक म्हणजेच
त्यान जिवापाड जपलेली परी…,
© सुजित कदम, पुणे
7276282626