मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 31 – वसंत ☆ सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी अतिसुन्दर कविता “वसंत ”. सुश्री प्रभा जी की कविता में प्रकृति एवं जीवन के सामंजस्य में ऋतुओं के परिपेक्ष्य में रचित रचना हमें हमारी स्मृतियों में ले जाती है । आखिर नव वर्ष का शुभारम्भ किसी जन्म उत्सव से कम तो नहीं है न ?
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 31 ☆
☆ वसंत ☆
दारातल्या शिरीषाची पानगळ सुरू झाली,
आणि मला आठवली
हातातून निसटून गेलेली,
संसारातली कित्येक वर्षे,
किती निमूटपणे जगत राहिलो,
ऋतुचक्राप्रमाणे बदललो ही नाही कधी!
रहाटगाडग्यासारखे
फिरत राहिलो स्वतःभोवतीच!
आज अचानक तू म्हणालास,
“घराचा रंग आता बदलायला हवा ”
आणि शिरिषावर कोकीळ गाऊ लागला शुभ शकुनाचे गीत !
तेव्हा मी सताड उघडले घराचे दार,
परवा परवा ओका बोका दिसणारा शिरीषवृक्ष
झाला होता
घनदाट हिरवागार ,
मी म्हणाले,
“यंदा जरा जास्तच *पालवी* फुटली आहे नाही?”
तू म्हणालास,
“तुझं लक्ष कुठंय?
,जरा वर नजर कर,
फुलांचे झुबके ही झुलताहेत !
तू फक्त पानगळच पहातेस…
प्रत्येकाच्या दाराशी वसंत येतोच कधीतरी…
मनातला कोकिळ मात्र जपायला हवा!”
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]