मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 33 – मी ☆ सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी अतिसुन्दर कविता “मी”. सुश्री प्रभा जी की कविता अनुवंश एक विमर्श ही नहीं आत्मावलोकन भी है। यह कृति सक्षम है सुश्री प्रभा जी के व्यक्तित्व की झलक पाने के लिए। यह गंभीर काव्य विमर्श है । और वे अनायास ही इस रचना के माध्यम से अपनी मौलिक रचनाओं एवं मौलिक कृतित्व पर विमर्श करती हैं। अभिमान एवं स्वाभिमान में एक धागे सा अंतर होता है और पूरी रचना में अभिमान कहीं नहीं झलकता । झलकती है तो मात्र कठिन परिश्रम, सम्पूर्ण मौलिकता और विरासत में मिले संस्कार । इस बेबाक रचना के लिए बधाई की पात्र हैं।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 33 ☆
☆ मी ☆
मी नाही देवी अथवा
समई देवघरातली!
मला म्हणू ही नका
कुणी तसले काही बाही !
कुणा प्रख्यात कवयित्री सारखी
असेलही माझी केशरचना,
किंवा धारण केले असेल मी
एखाद्या ख्यातनाम कवयित्री चे नाव
पण हे केवळ योगायोगानेच !
मला नाही बनायचे
कुणाची प्रतिमा किंवा प्रतिकृती,
मी माझीच, माझ्याच सारखी!
एखाद्या हिंदी गाण्यात
असेलही माझी झलक,
किंवा इंग्रजी कवितेतली
असेन मी “लेझी मेरी” !
माझ्या पसारेदार घरात
राहातही असेन मी
बेशिस्तपणे,
किंवा माझ्या मर्जीप्रमाणे
मी करतही असेन,
झाडू पोछा, धुणीभांडी,
किंवा पडू ही देत असेन
अस्ताव्यस्त !
कधी करतही असेन,
नेटकेपणाने पूजाअर्चा,
रेखितही असेन
दारात रांगोळी!
माझ्या संपूर्ण जगण्यावर
असते मोहर
माझ्याच नावाची !
मी नाही करत कधी कुणाची नक्कल
किंवा देत ही नाही
कधी कुणाच्या चुकांचे दाखले,
कारण
‘चुकणे हे मानवी आहे’
हे अंतिम सत्य मला मान्य!
म्हणूनच कुणी केली कुटाळी,
दिल्या शिव्या चार,
मी करतही नाही
त्याचा फार विचार!
कुणी म्हणावे मला
बेजबाबदार, बेशिस्त,
माझी नाही कुणावर भिस्त!
मी माणूसपण जपणारी बाई
मी मानवजातीची,
मनुष्य वंशाची!
मला म्हणू नका देवी अथवा
समई देवघरातली!
मी नाही कुणाची यशोमय गाथा
मी एक मनस्वी,
मुक्तछंदातली कविता!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]