श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है एक हृदयस्पर्शी कविता “गेली कित्येक वर्षे…!” )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #31☆
☆ गेली कित्येक वर्षे…! ☆
शहरात गेल्यापासून
तुम्ही पार विसरून गेलात मला..,
आज इतक्या वर्षानंतर
तुम्ही मला घर म्हणत असाल की नाही
ठाऊक नाही…
पण मी अजूनही सांभांळून ठेवलंय..,
घराचं घरपण
तुम्ही जसं सोडून गेलात तसंच . . .
गेल्या कित्येक वर्षात
अनेक उन पावसाळ्यात
मी तग धरून उभा राहतोय
कसाबसा…. तुमच्या शिवाय…
रोज न चुकता
तुमच्या सर्वांचीआठवण येते …
पण खरं सांगू . . .
आता नाही सहन होत
हे ऊन वा-याचे घाव …
माझ्या छप्परांनीही आता
माझी साथ सोडायचा निर्णय घेतलाय…
माझा दरवाजा तर
तुमची वाट पाहून पाहून
कधीच माझा हात सोडून
निखळून पडलाय….!
माझ्या समोरच अंगण तुळशीवृंदावन
सगळंच कसं दिसेनास झालंय आता…
माझ्या भिंतीनी माझा श्वास
मोकळा करून देण्या आधी
एकदा तरी . . . फक्त एकदा तरी ….
मला भेटायला याल अशी आशा आहे…!
तूमचं घर तुमची वाट पाहतय…!
गेली कित्येक वर्षे …. . . !
© सुजित कदम, पुणे
7276282626