मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #34 – मानवतेचा झेंडा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है गणतंत्रता दिवस के अवसर पर रचित मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण एक विचारणीय कविता  “मानवतेचा झेंडा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 34☆

☆ मानवतेचा झेंडा ☆

(सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! )

 

मानवतेचा झेंडा घेउन फिरतो मी तर

जोडू हृदये मने जिंकुया ध्यास निरंतर

 

काल फुलांच्या झाडाखाली जरा पहुडलो

कोण शिंपुनी देहावरती गेले अत्तर

 

देशोदेशी नेत्यांच्या या इमले माड्या

प्रत्येकाच्या वाट्याला ना येथे छप्पर

 

शूर विरांच्या कर्तृत्वावर संशय घेती

जी जी करुनी अतिरेक्यांचा करती आदर

 

देशभक्त हे मुसलमान तर शानच आहे

रोहिंग्यांचा फक्त बांधुया बोऱ्याबिस्तर

 

देशासाठी धर्म बाजुला ठेवू थोडा

मिळून सारे कट्टरतेला देऊ टक्कर

 

ईद दिवाळी मिळून सारे करू साजरी

खिरीत हिंदू लाडुत मुस्लीम होवो साखर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८