मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 34 – असंच काहीसं…! ☆ श्री सुजित कदम
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है परमपूज्य माँ के स्नेह प्रेम पर आधारित एक भावप्रवण एवं संवेदनशील कविता “असंच काहीसं…!”)
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #34☆
☆ असंच काहीसं…! ☆
मायेला हाँस्पिटल मध्ये
एडमिट केल्यापासून
तिच्या पासून दूर जावं
असं वाटतच नाही
कारण…,
जरा अवघडलेले पाय
मोकळे करायला
म्हणून मी बाहेर पडावं
अन् नेमकं .. .
तेव्हाच मनात येतं…
मी लहान असताना
आजारी पडल्यावर
माझ्या उशाशी बसणारी
माझी माय….,
क्षणभर जरी मला
दिसेनाशी झाली ना…,
तरी मी किती घाबरायचो
कावराबावरा व्हायचो.. .
अन् मायेला हाक मारायचो….
ती हातातलं काम सोडून
पुन्हा माझ्या जवळ
येऊन बसायची…
आज.. क्षणभर जरी मी
तिच्यापासून दूर झालो
आणि.. . . .
तिचंही असच काहीसं
झालं तर.?
मी अवघडलेल्या पायांनी तसाच
मागे फिरतो…
मायेच्या हाकेला ओ देण्यासाठी…!
© सुजित कदम, पुणे
7276282626