श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “जरीचे धागे”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 38☆
☆ जरीचे धागे ☆
उभ्या आडव्या धाग्यांमधली सुंदर नक्षी
कधी मोर तर कधी साजरा दिसतो पक्षी
अशी पैठणी पदरावरती मोर नाचरा
पदर पिसारा स्थिरावलेला माझ्या वक्षी
कधी जरीचे धागे असती बुट्यांवरती
मोल तयांचे भरून आहे माझ्या चक्षी
जन्मा येता वस्त्राशी या जडते नाते
धडपड असते वस्त्रासाठी येथे अक्षी
वस्त्र हरण हे करणारे तर घरचे होते
श्रीकृष्णाचा धावा करता लज्जा रक्षी
या झेंड्याचे प्राणपणाने करतो रक्षण
तुझ्याचसाठी मनात श्रद्धा तू तर बक्षी
रक्षण करते देहाचे या वस्त्र जरी हे
त्याच्या खाली मांस शोधती हे नरभक्षी