श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “वेदवाणी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 39☆
☆ वेदवाणी ☆
वेद आता वाचण्याचे वेड नाही
चार वेदांना जगी या तोड नाही
संपवाया वेद सारे जे निघाले
येत त्यांची का तुम्हाला चीड नाही ?
वेद सांगे सूक्ष्म गणना या जगाला
संकृतीची त्या तरीही चाड नाही
वेद म्हणजे बहरलेला वृक्ष वेड्या
ते झुडुप वा बाभळीचे झाड नाही
वेदवाणी जीवनाचा ज्ञान सागर
कोणतेही ज्ञान इतके गोड नाही
वाचलेला वेद नाही तो बरळतो
माणसाची चांगली ही खोड नाही
जीवनाच्या सागराचा मार्ग खडतर
आणि माझ्या गलबताला शीड नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८