मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #2 – स्वतःपण… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

? मी_माझी  – #2 – स्वतःपण…? 

(स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की द्वितीय कड़ी  स्वतःपण… । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )

 

स्वतःशी बोलता आलं पाहिजे,

बोलता बोलता थांबता आलं पाहिजे…

 

हे कसं जमायचं?

ह्याच विचारात स्वतःशी कधी बोललेच नाही,

आणि जेव्हा बोलले, तेव्हा,

स्वतःची ओळख पटेना !

मी कशी आहे, कशी असायला पाहिजे, कशी होते,

का होते, असे अनेक प्रश्न रुंजी घालतात…

 

उत्तरांच्या जंजाळात मी स्वतःचं स्वतःपण विसरून जाते…

 

खरंच, असं काही आहे का?

 

स्वतः पण…

 

हे काय असतं, कोणी सांगेल का मला?

 

आतून उत्तर येतं, कोणीच सांगू शकणार नाही,

तुलाच ते शोधायचं आहे

आणि त्याबरोबर जगायचं आहे…

स्वतःपण आणि स्वार्थ ह्यात जमीन आसमानचा फरक आहे,

हे विसरू नकोस…

 

मग तुझ्या स्वतःपणला लकाकी येते की नाही बघ…

झोपेतून जागी झाले तेव्हा एवढंच कळलं,

काही तरी नक्की हरवलंय, तेच स्वतःपण नसेल ना !

 

© आरुशी दाते