सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक समसामयिक भावपूर्ण आलेख एवं कविता “कोरोना व्हायरस चे थैमान“ । मैं सुश्री प्रभा जी के विचारों से सहमत हूँ एवं सम्पूर्ण विश्व में शान्ति एवं मानवता के लिए रचित प्रार्थना का सर्वजन हिताय एवं सर्वजन सुखाय के सिद्धांत हेतु उनकी प्रार्थना में उनके साथ एक प्रार्थी हूँ । इस भावप्रवण अप्रतिम रचना एवं प्रार्थना के लिए उनको साधुवाद एवं उनकी लेखनी को सादर नमन ।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 42☆
☆ कोरोना व्हायरस चे थैमान ☆
चीन मध्ये निर्माण झालेल्या कोरोना नावाच्या विषाणू ची सगळ्या जगात दहशत निर्माण झाली आहे. या विषाणू ची बाधा म्हणजे “महामारी” असे दृश्य दिसतेय, पूर्वी “करोना” नावाची एक शूज कंपनी होती, या कंपनीची चप्पल वापरल्याचेही मला स्मरते आहे..आज एक मजेशीर विचार मनात आला, हा “क्राऊन” च्या आकाराचा विषाणू विधात्या च्या पायताणाखाली चिरडला जावा.हीच प्रार्थना!
या आपत्तीमुळे संपूर्ण मानवजात हादरली आहे.योग्य काळजी तर आपण घेतच आहोत, घरात रहातोय, घरातली सर्व कामं स्वतः करतोय, कौटुंबिक सलोखा राखतोय, प्रत्येकाला ही जाणीव आहेच, “जान है तो जहां है।”
आज चैत्र प्रतिपदेला माझी ही प्रार्थना सा-या विश्वा साठी—–
? प्रार्थना ?
येवो प्रचंड शक्ती या प्रार्थनेत माझ्या
येथे पुन्हा नव्याने चैतन्य दे विधात्या
आयुष्य लागले हे आता इथे पणाला
हे ईश्वरा सख्या ये प्राणास वाचवाया
अगतिक नको करू रे तू धाव पाव आता
साई तुझ्या कृपेची आम्हा मिळोच छाया
लागो तुझ्याच मार्गी ओढाळ चित्त रामा
सारी तुझीच बाळे सर्वांस रक्षि राया
हे बंध ना तुटावे सांभाळ या जिवाला
देवा तुझ्याच हाती प्रारब्ध सावरायला
येथे पुन्हा नव्याने बहरोत सर्व बागा
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]