मानवीय एवं राष्ट्रीय हित में रचित रचना
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामायिक भावप्रवण कविता “कोरोना, नकोच तुझे सरकार”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 44 ☆
☆ कोरोना, नकोच तुझे सरकार☆
(अजब तुझे सरकार या गीताची समछंदी रचना)
कोरोना, नकोच तुझे सरकार
शतकामध्ये कधी न पाहिला, हा असला आजार
भेटीतून हा पसरे जगभर, चला ठेवुया थोडे अंतर
दुसरे नाही औषाध यावर, हाच एक उपचार
प्रत्येकाला मिळे कोठडी, महल असो वा असो झोपडी
प्राण्यांहूनही माणूस झाला, आज इथे लाचार
रस्त्यांवरचे दृष्य वेगळे, रस्ते सारे इथे मोकळे
प्रदूषण आणि अपघाताने, नाही कुणी मरणार
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८