श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक अत्यंत भावप्रवण एवं प्रेरक कविता “लढूया लढाई….!”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #41 ☆
☆ लढूया लढाई….! ☆
(जागतिक महामारी कोरोना विषाणू चे संकट संपूर्ण जगावर असताना आपण प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून लाॅक डाऊन चा मार्ग अवलंबिला आहे. या काळात सुचलेली एक रचना खास आपल्यासाठी. . . . !)
इवला विषाणू फिरे गावोगाव
महामारी वाव देण्यासाठी . . . . !
लढूया लढाई घेऊनी माघार
टाळूयात वार कोरोनाचा.. . !
प्रसारा आधीच सावधानी हवी
संरक्षण हमी कुटुंबास.. . . !
धन आरोग्याचे ठेऊ सुरक्षीत
करू आरक्षीत जीवनाला .. . !
नको गळामिठी करू नमस्कार
नवे सोपस्कार पूर्ण करू. . . . !
गर्दीच्या ठिकाणी नको येणे जाणे
टाळूयात जाणे पदोपदी. . . . .!
संचार बंदीत संपर्क टाळूया
नियम पाळूया बचावाचे . . . . !
वारंवार स्वच्छ ठेवू घरदार
संसर्गाचा वार घातदायी . . . . . !
सर्दी खोकल्यात उपचार करू
रूमालास धरू नाकापुढे ……!
अंतर ठेवून येवू संपर्कात
सौख्य बरसात आशादायी. . . . !
करोना लागण आहे महामारी
मृत्यू लोक वारी ठरू नये.. . !
विचित्र हा शत्रू कुणा ना दिसला
मारीत सुटला जग सारे. . . . !
परतूनी लावू एक एक वार
टाळूया संचार भोवताली . . . . !
करू संरक्षण नियमास पाळू
टाळू महामारी विनाशक.. . !
…©सुजित कदम
मो.७२७६२८२६२६