सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में “चार कणिका“। विभिन्न मनःस्थितियों पर आधारित चारों कणिकाएं अपने आप में अद्भुत हैं और विभिन्न मनःस्थितियों की सहज विवेचना करती हैं । इन भावप्रवण चारों कणिकाओं की रचना के लिए उनकी लेखनी को सादर नमन ।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 45 ☆
☆ चार कणिका ☆
– १ –
उन्हाचा चढलाच आहे पारा,
उलघाल तनामनाची,
एक छोटासा शिडकावा
हवा आहे,
थंडगार पाण्याचा!
– २ –
सुख असंच निसटून जातं
हातातून पा-यासारखं
शाश्वत, आजन्म पुरणारं
हवं आहे काहीतरी…..
– ३ –
मी तुझ्या प्रेमात
आकंठ बुडालेली असताना,
तुझा पारा चढलेला,
आणि तू सज्ज,
शब्दांची शस्त्र पाजळून,
युध्दासाठी….
– ४ –
तू किती सुंदर आणि नाजूक,
प्राजक्तफुलावरच्या
दवासारखी ,
मी उगाचच म्हणते का तुला
“बेगम पारा”
कधी कधी!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com