सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक समसामयिक संस्मरणीय आलेख एवं एक संवेदनशील कविता “मदर्स डे।  यह सही है कि हमारी समवयस्क पीढ़ी ने वर्ष में कोई एक दिन किसी को समर्पित नहीं किया था। हमारे प्रत्येक दिन प्रत्येक को समर्पित हुआ करते थे। जब सुश्री प्रभा जी की दोनों रचनाएँ प्राप्त हुई तो निर्णय करना अत्यंत कठिन था कि किसे प्रकाशित किया जाये। फिर लगा किसी एक रचना को भी पाठकों तक न पहुँचाना दूसरी रचना के साथ भावनात्मक रूप से अन्याय होगा। अतः आपसे विनम्र अनुरोध है कि आप दोनों ही रचनाएँ आत्मसात करें। सुश्री प्रभा जी  के “माँ /आई  “शब्द के शब्दचित्र को साकार करती  हुई लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 50 ☆

☆ मदर्स डे -1 ☆ 

 पुष्कर नावाच्या मुलाचा मेसेज आला, ताई “मदर्स डे” साठी आई विषयावरची  कविता विडीओ रेकॉर्ड करून पाठवा. तशा आई विषयावर चार पाच कविता आहेत माझ्या. आई वर पहिली कविता १९९१ साली लिहिली….एका “आई” संमेलनाचे  निमंत्रण आले तेव्हा कुंडीतला जाईचा वेल पाहून शब्द सुचले….बहरली अंगणी जाई अन आठवली माझी आई,

मन आईचे निर्मळ,शुभ्र फुलांची ओंजळ……. पण ही कविता कालौघात हरवली..

पुष्कर च्या या कवितेच्या मागणीनं आईचं  आयुष्य नजरेसमोरून तरळून गेलं….

माझी आई….पूर्वाश्रमीची  सरोजिनी देशमुख सुशिक्षित सुसंस्कृत घरात जन्मलेली तिचे वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर,या पदावरून निवृत्त झाल्या  नंतर कोकणात शेती करत होते,तिची आई सामाजिक कार्यकर्ती…….

लग्नात तिचं नाव उर्मिला ठेवलं होतं पण पुढे

सरोजिनीेच  नाव प्रचलित राहिलं, सरोजिनी जगताप- माझी आई,  गावचे पोलिस पाटील, संत्रा मोसंबीचे बागाईतदार असलेल्या बाजीराव जगताप यांची पत्नी! त्या काळात घर, घराण्याचा रूबाब काही वेगळाच होता,पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती, आईवडील -आगळी वेगळी व्यक्तिमत्व, दोघांचा घरात, जनमानसात दरारा होता, माझी आई नाकी डोळी नीटस, चारचौघीत उठून दिसणारी,सातवी शिकलेली, वाचनाची आवड, भरतकाम, विणकाम, स्वयंपाक करण्यात कुशल, सुंदर रांगोळ्या काढायची,देवपूजा न चुकता रोज, अनेक व्रतवैकल्ये करायची, चंदेरी साड्या, दागदागिन्यांची आवड, सिंह राशीची असल्याने  स्वभावाने कडक त्यामुळे तिच्या माझ्यात फार भावूक ,तरल असं नातं कधीच निर्माण झालं नाही, माझ्या लग्नात वडील खुप रडले पण ती रडली नाही याचा अर्थ तिला दुःख झालं नाही असं नाही. लहानपणी, शाळेत असताना तिने कधीच कुठली कामं करायला लावली नाहीत.तिच्या हाताखाली दोन तीन बाया असल्यामुळे असेल पण स्वयंपाक ती एकटीच करायची आम्ही सख्खी चुलत सहा भावंडे होतो,आमच्या शिक्षणासाठी ती तालुक्याच्या गावी बि-हाड करून राहिलेली.

ती सुगरण होती,तिच्या हाताला चव होती, स्वयंपाकाचा तिने कधीच कंटाळा केला नाही. ती खरोखर असामान्य स्त्री होती, सतत आजारपण येत असायचं, अनेक आपत्ती आल्या, मानसिकरित्या खचलीही..पण एकटीच आयुष्याचा लढा देत राहिली, ७८ वर्षाचं आयुष्य लाभलं तिला, मला आठवतं तसं ती …तिची बदलत गेलेली रूपं… मानिनी…सुगरण…अलिप्त….संन्यस्त…

तिच्या आयुष्याची कहाणी विलक्षणच! माझी मैत्रीण म्हणायची तुझी आई जयश्री गडकर सारखी दिसते  ……तिची कहाणी ही चित्रपटासारखीच!

तिच्या समस्त आठवणीं समोर नतमस्तक व्हायला होतंय आज कारण ती असामान्य होती…..अनाकलनीय ही ..विनम्र अभिवादन

 

☆ मदर्स डे -2

तेव्हा मदर्स डे वगैरे

नव्हते साजरे होत…

आई खुप जवळची

वाटली नाही कधी….

कदाचित तिला मम्मी म्हणत  असल्यामुळे!

 

ती उठून दिसायची शंभरजणीत !

इतर आयांपेक्षा वेगळी होती निश्चितच !

 

हाताखाली तीन बायका असल्यातरी कष्टत रहायची स्वतःही….

 

पाहिले आहे तिला,

चुलीशी..जात्यावर….उखळापाशी

 

रांधताना…

वाढताना..

उष्टी काढताना…

वाळवणं करताना..लोणची पापड मुरंबे करताना…बुंदी पाडताना…

जिलेब्या तळताना…

विणताना…

निवडताना…पाखडताना…. .

भरडताना….झाडं लावताना..फुलं गुंफताना…रांगोळ्या काढताना..

 

आणि अखेर जळताना ही…

तिचं जगणं…जगत राहिली…

सा-या भूमिका मुकाट्याने निभावत राहिली..

 

एक घरंदाज…ठसठशीत व्यक्तीमत्व   …

एक सर्व कलासंपन्न…. अन्नपूर्णा….माता..भगिनी…

आणि

एक शापित स्त्री….

बहुत दिन हुए सारख्या फॅन्टसी सिनेमातल्या नायिके सारखी…

खरीखुरी……अनाकलनीय..गुढ..

एक शोकांतिका!!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

धन्यवाद हेमंतजी, आपकी प्रस्तावना बहुत सुन्दर है ।