सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक अत्यंत भावप्रवण एवं संवेदनशील कविता “पाणी“। मैं निःशब्द हूँ यह कविता पढ़कर। पानी या जल पर रचित यह पहली रचना नहीं है जो मैंने या आपने पढ़ी हो किन्तु, यह अन्य कविताओं से भिन्न क्यों है यह तो आप पढ़ कर ही अनुभव कर सकते हैं। जल से जीवन जितना जुड़ा है संभवतः संवेदनाएं भी उससे कम नहीं जुडी हैं, जिन्हें सुश्री प्रभा जी ने अत्यंत ही सहज भाव से लिपिबद्ध कर दिया है। सुश्री प्रभा जी की इस संवेदनात्मक रचना जो हृदय को जल की भांति तरंगित करती है उस लेखनी को सादर नमन ।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 51 ☆
☆ पाणी ☆
मला आठवते…
त्या ओढ्यातील खळाळते पाणी,
पैंजण पायी अन अनवाणी,
भर दुपारी किती उडविले
छुमछुमते पाणी!
शांत जलाशय-तळे कमळाचे,
खडा टाकला आणि पाहिले
थरथरते पाणी,
त्या तळ्याची आठव येता,
मनःपटलावर,
झरझरते पाणी!
सतरा कमानी पुलाखाली,
कधी न पाहिले,घोडनदीचे,
दौडणारे वा दुडदुडते पाणी,
पुसल्या खाणाखुणा तरीही,
मनीमानसी त्याच नदीचे,
झुळझुळते पाणी!
अथांग सागर, गाज लाटांची,
दर्यावरी त्या जडली प्रीती,
आत उतरूनी घेऊ पाहिले,
ओंजळीत अवखळ ते पाणी,
त्यास चुंबिले आणि उमगले,
ओठांवर व्याकुळ ते पाणी!
ओढा, तळे, नदी नी सागर,
डोळा पाहिले आणि स्पर्शिले
वेगवेगळे कुरकुरते पाणी!
आयुष्याची तल्खी शांतवी
असे लाभले एकच पाणी,
या पाण्याचे ऋण जीवावर,
तृप्ती सुखाची—-
ते मुळामुठेचे सळसळते पाणी!
जन्म एकदा पुण्यात मिळावा,
म्हणून पुण्यवान आत्म्यांच्याही,
डोळ्यांमधले कळवळते पाणी!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
धन्यवाद हेमंतजी, सुंदर प्रस्तावना
Thanks