मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #4 – शस्त्रक्रिया ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । साप्ताहिक स्तम्भ अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक कवि के हृदय में काव्य सृजन की प्रक्रिया को उजागर करती उनकी कविता “शस्त्रक्रिया”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 4 ☆
कवीच्या भावनांचा कोलाहल
हृदयातून कागदावर मांडण्यासाठी
लेखणीला बनावं लागतं शस्त्र
आणि कागदाची शुभ्र कातडी चिरून
करावी लागते शस्त्रक्रिया
सर्जरी करताना
डाॕक्टराला ठेवावं लागतं भान
आणि कविता करताना
कवीला जपावी लागते सर्जनशील वृत्ती
सर्जरी पूर्ण झाल्यावर
एका जीवाला जीवदान दिल्याचा आनंद
जेवढा डाॕक्टरला होते
तेवढाच आनंद
एका कवितेच्या सृजनाने कवीलाही होतो
डाॕक्टर कातड्याला टाके घालतो
आणि कवी भावनांना
एवढाच दोघांमध्ये काय तो फरक…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८