सौ. सुजाता काळे
(सौ. सुजाता काळे जी मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं। वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं। उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है सौ. सुजाता काळे जी द्वारा रचित एक अतिसुन्दर भावप्रवण कविता “गावाचेच घेतो नाव”। )
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 39 ☆
☆ गावाचेच घेतो नाव ☆
अधुन मधुन वळतो मी
बघण्या माझा गाव
वडाच्या पारंब्यावर
झोक्याची झुकलेली मान
रहाटाच्या दोरीचे वळ
तळहातावर अजून
सरपण काढताना
उठलेले व्रण ठासून
रोज चोळून घासतो
हातावरचा डाग
आईने फेकून मारलेल्या
जळत्या लाकडाचा डाग
निखारा तो धगधगतो
गाव सोडला तरीही
कोरभर भाकरीसाठी
आई वडिलांची गरीबी
ही गरीबी दूर करण्या
गेलो सोडून मी गाव पण
माझी ओळख सांगण्या
गावाचेच घेतो नाव .
© सुजाता काळे
पंचगनी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684