श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत मार्मिक, ह्रदयस्पर्शी एवं भावप्रवण कविता “साखरेची गोळी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 52 ☆
☆ साखरेची गोळी☆
होती चुकून गेली
मिरची घशात माझ्या
असतेच साखरेची
गोळी खिशात माझ्या
पाहून बालकांना
मी जाम खूष होतो
जपलेय बालपण मी
या काळजात माझ्या
स्वप्नी अजून माझ्या
तो खेळ रोज येतो
होतेच टॉम जेरी
जे बारशात माझ्या
थकलो जरी अता मी
वय हे उतार झाले
हे केस चार काळे
आहे मिशीत माझ्या
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
सुंदर रचना