श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत मार्मिक, ह्रदयस्पर्शी एवं भावप्रवण कविता “देहाची शाल”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 54 ☆
☆ देहाची शाल☆
ती सुगंध उधळित यावी मी मलाच उधळुन द्यावे
ती लाजत मुरडत जाता डोळ्यांत साठवुन घ्यावे
तो वसंत येतो जेव्हा ती फूल होउनी जाते
श्वासात उतरते तेव्हा माझाच श्वास ती होते
चंद्राचे रूप धवल हे त्या मुखकमळावर येते
ती प्रकाशकिरणे त्यातिल मज जाता जाता देते
पाहतो किनारा आहे किती व्याकुळतेने वाट
ती फेसाळत मग येते होऊन प्रीतीची लाट
तिमिराचा डाव उधळण्या काजवे घेउनी आलो
ती प्रसन्न व्हावी म्हणुनी मी वात दिव्याची झालो
प्रीतीच्या झाडावरती राघुने बांधले घरटे
मैना जे घेउन येते नसतेच गवत ते खुरटे
देहाची शाल करावी नि तिला लपेटुनी घ्यावे
मी भ्रमर होउनी अमृत त्या गुलाबातले प्यावे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
प्रेममय रचना