सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक आध्यात्मिक एवं दार्शनिक कविता भूपतीवैभव वृत्त । सुश्री प्रभा जी की यह रचना वास्तव में जन्म और पुनर्जन्म के मध्य विचरण करते ह्रदय की व्यथा कथा है। पंढरपुर जाना कब संभव होगा यह तो उनके ही हाथों है किन्तु, विट्ठल की कृपा इस जीवन में सदैव बनी रहे यही अपेक्षा है। सुश्री प्रभा जी द्वारा रचित इस भावप्रवण रचना के लिए उनकी लेखनी को सादर नमन।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 57 ☆
☆ भूपतीवैभव वृत्त ☆
पाहिले कधी ना स्वप्न वेगळे काही
चौकटी घराच्या मुळी मोडल्या नाही
वाटले असे की एक सारिका व्हावे
पिंज-यात राघूसंगे रुणझुण गावे
पण क्षणात ठिणगी चेतवून मज गेली
जगण्याला माझ्या नवी झळाळी आली
अवचितसे आले वाटेवरती कोणी
अन आयुष्याची झाली मंजुळ गाणी
नव्हताच कोणता सोस मला नटण्याचा
मी स्वतः स्वतःचा मार्ग एक जगण्याचा
मज कळले होते नाते काय स्वतःशी
साक्षात काव्य ते होते हृदया पाशी
मी येथे आले या धरणीवर केव्हा
गत जन्माची मज ओळख पटली तेव्हा
ही तहान आहे युगायुगांची माझी
प्रत्येक जन्म हा एक कहाणी ताजी
अरे विठ्ठला कसे यायचे पंढरपूरा
नको वाटते जिणेच सारे या घटकेला
तुझ्या कृपेची छाया राहो आयुष्यावर
नको कोणते आरोप झुटे दिन ढळल्यावर
पापभिरू मी सदा ईश्वरा तुलाच भ्याले
आणि विरागी वस्त्रच भगवे की पांघरले
कोणी माझे नव्हते येथे मी एकाकी
संकटकाळी तुला प्रार्थिले असेतसेही
अशी जराशी झुळूक आली आनंदाची
आणि वाटले जन्मभरीची हीच कमाई
भ्रमनिरास होता व्यर्थच की सारे काही
दूर पंढरी दूर दूर तो विठ्ठल राही
निष्क्रिय वाटे,नसे उत्साह का जगताना
विठुराया तुज शल्य कळेना माझे आता
भेटीस तुझ्या आतुरले मन येई नाथा
अस्तिकतेचा भरलेला घट माझा त्राता
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
अच्छी रचना
धन्यवाद सर
खुपच सुंदर!!!!
धन्यवाद सर