कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प चौथा  – कॉर्पोरेट जगत” ।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प चौथा #-4 ☆

 

कॉर्पोरेट जगत 

 

जमाना बदलतोय असे एकीकडे म्हणायचे अन दुसरी कडे मात्र नावावरुन, जातीवरून त्याला काम द्यायचे का नाही हे ठरवायचे हेच सर्वत्र पहायला मिळते.

बारा बलुतेदारी पद्धत गेली. अठरा पगड जातीचा समाज कामासाठी देशाच्या कानाकोपर्यात विभागला गेला. त्या जात बांधवाचे एकीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे त्यात कार्पोरेट जगत मागे नाही.

मोठमोठय़ाल्या फीया भरून, डोनेशन देऊन पदवीधर झालेले हे लक्ष्मीपुत्र ठरावीक ठिकाणी बरोबर कामाला लागतात.  एखादा वरच्या हुद्द्यावरील अधिकारी  आपले युनिट तयार करताना,  आपल्या हाताखालील कामगारांची भरती करताना आपल्या गणगोताला प्राधान्य देतो.  बहुतांश कंपनीत अशी साखळी तयार झाली आहे. कामगारांची संख्या, भरती जातीनिहाय होत नाही पण कामाची विभागणी मात्र जातीनिहाय केली जाते. कम्युनिकेशनचे गोंडस नाव देऊन ही साखळी  एकेक विभाग सांभाळू लागते. काही दिवसांनी जेव्हा प्रमोशन ची वेळ येते तेव्हा हे वाद  विवाद  चव्हाटय़ावर येतात.  त्याचा बाॅस त्याला दुसऱ्या विभागात जाऊ देत नाही. आपला माणूस  आपल्या हाताखाली  कार्यरत रहावा  यासाठी राजकारणी डावपेच खेळले जातात.

जात  एकत्रीकरण तळागाळातून देखील सुरू झाले आहे. त्याचा फार मोठा फायदा काॅरपोरेट जगतानं उचलला आहे.  पेपरविक्रेते,  दूधविक्रेते – उत्पादक संघटना,  कृषी उत्पन्न समित्या,  हमाल पंचायत, बाजार समिती,  बचत गट,  अंगण वाडी,  अनाथाश्रम, वसतिगृहे , पतसंस्था, बॅका सर्व ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देताना जातीचा विचार केला जातो.  इतकेच काय व्यवसाय प्रशिक्षण देताना देखील जातीनिहाय सवलती देऊन प्रशिक्षण दिले जाते. शिक्षण संस्था देखील यामध्ये मागे नाहीत. ही जातीनिहाय  एकत्रिकरणाची साखळी जन्मदाखल्यापासून सुरू होते. विविध  संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पॅनेल मधून ही जातीयता ठळक पणे निदर्शनास येते.

मुलाला शिक्षण देतात संस्थेचा नावलौकिक पहाण्यापेक्षा संचालकांचे जातकूळ त्याची माहिती काढली जाते.  सोशल नेटवर्किंग साइट्स वरून जरी प्रवेश परीक्षा दिल्या जात  असल्या तरी प्रत्यक्षात राखीव जागेच्या कोट्यातून राजकारण खेळवले जाते.  व्यापारी संघटनांमधे हा जातीयवाद मोठ्या प्रमाणावर जाणवतो. काॅरपोरेट जगताचे लागेबांधे शेअर्स,  डिबेंचर्स , भांडवलदार यांच्याशी  इतके  घट्ट  असतात की ‘विश्वासाची माणस’ या नावाखाली जातीनिहाय एकत्रिकरण राजरोस केले जाते. विविध राजकीय पक्षांच्या पाठबळावर हे काॅरपोरेट क्षेत्र उत्तुंग भरारी घेते आहे.

एकमेकां साह्य करू, किंवा तू मला  ओवाळ आता, मी तुला  ओवाळतो या न्यायाने पैशाच्या जोरावर माणूस  आपापल्या जातीतल्या व्यक्तीना रोजगार देऊन,  व्यवसाय प्रशिक्षण देऊन सशक्त बनवित आहे. जस  छापा  आणि काटा  या नाण्याचा दोन बाजू पाहिल्या जातात तश्या ‘सिन्सियर ‘  या  छत्राखाली या जातीवली तयार केल्या जातात. हे केवळ एकत्रिकरणावर थांबत नाही तर  जातीनिहाय  एकत्रिकरण झाले की संघटीकरण सुरू होते. आणि संघटीकरण झाले की आरक्षण वाद सुरू होतो. गुणवत्ता डावलून सांभाळून घेण्याची वृत्ती  आली की जातीयवाद बोकाळतो. विविध संघटना मध्ये गटातटाचे राजकारण होते  आणि याचा फायदा सर्वाधिक काॅरपोरेट जगताला होतो आहे.

पर्सनल सेक्रेटरी पासून  ऑफिस बाॅय पर्यंत सर्व ठिकाणी हे गट तट पहायला मिळतात. नोकर्‍या मिळवून देणाऱ्या संघटनेत याची सविस्तर माहिती  उपलब्ध होते.

दोष  एकत्रिकरण किंवा संघटीकरणाचा नाही तर दोष जातीयवादी दरी निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा आहे.  काॅरपोरेट क्षेत्राचा मूळ उद्देश  एकत्रिकरण,संघटन,  उत्पादन, विकसन आणि सेवा उपलब्धी हे  असल्याने  इथे हा जातीयवाद कॅन्सर सारखा समाजमनात पसरत चालला आहे.

माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकले हा जातीयवाद काही अंशी कमी होईल. असे मला वाटते. पण  ‘आपला’ हा शब्द माणसाला चिकटला  आणि माणूस जातीच्या रूळावरून चालायला लागला. हे रूळ समांतर रेषा बनून धावतात  आणि तिथेच काॅरपोरेट क्षेत्र विस्तृत होत जाते. जात  आणि पैसा यांच्या पारडय़ात तोलला जाणारा माणूस  या  काॅरपोरेट क्षेत्रात आपण जगतो कुणासाठी,  कशासाठी हेच विसरला  आहे काॅरपोरेट जगतात  माणूस माणसाला दुरावला आहे हेच खरे वास्तव आहे.

हे  वास्तव स्विकारायचे कि बदलायचे हे ही  आता माणसानेच ठरवायचे. ही जातीयवादाची पोकळी भरून काढण्यासाठी काय पाऊले उचलायची हे व्यक्ती निहाय.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments