श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “कवितेचा पक्षी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 59 ☆
☆ कवितेचा पक्षी ☆
माझ्या कवितेचा पक्षी
फिरे आकाशी चौफेर
मोत्या सारखं अक्षर
त्याला विणण्याला जर
अशी मोत्याची या माळ
कंठी जाता होई सूर
कशी शब्दांच्या या भाळी
बिंदी शोभते कपाळी
कुंकू भाळात भरलं
चंद्रकोर त्याच्यावर
मात्रा असते बोलकी
जशी खांद्यावर काठी
कुणी भेटता नाठाळ
देई शब्दांचा ही मार
शब्द करतो संस्कार
तोच जीवनी आधार
जरा जपून वापरा
त्याला असते हो धार
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
सुंदर रचना
सुस्वागतम् आणि अभिनंदन
सुरेख काव्यकल्पना.’शब्द करतो संस्कार’ हे खरेच आहे.