श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “रियाज”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 61 ☆
☆ रियाज ☆
पापण्यांनी उघडले
आज धरणाचे दार
गेला वाहून हुंदका
येता आसवांना पूर
स्वप्न मनात हिरवे
उडे आकाशात घार
फडफड ही स्वप्नाची
होता पायामधे दोर
ताल भांड्यांनी धरला
त्यात शिजवली तूर
दिसभरचा रियाज
नाही सापडला सूर
चुली सोबत जळते
नाही देत ती नकार
तिच्या कष्टाला ना मोल
रोज रांधते भाकर
गंध कापराचा होता
त्याने भरलेले घर
लक्ष दिले नाही कुणी
गेला उडून कापूर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
कविता आवडली.