सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में स्त्री विमर्श पर एक अतिसुन्दर काव्यात्मक अभिव्यक्ति पादाकुलक वृत्त। मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 62 ☆
☆ पादाकुलक वृत्त ☆
मनी मानसी तूच राहसी
अखंड चाले तुझेच चिंतन
मला कळेना रोग कोणता
आत्म्या भवती कसले रिंगण ?
तूच राहसी श्वासांमध्ये
सदाकदा मी तुला घोकते.
राधा माधव मीरा गिरिधर
रूप तयांचे उभे ठाकते
तनामनाचा ताबा घेशी
अन हृदयीचा राजा होशी
तुझ्यावीण ना दूजा कोणी
आसपास तू सदा राहसी
तुझ्याच साठी सजते धजते
लाज न लज्जा आता उरते
अविचारी की स्वैरपणा हा
म्हण काहीही तुला हवे ते
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप छान कविता.इंदिरा संत यांच्या रचना आठवल्या.