सुजित शिवाजी कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #55 ☆
☆ आड पडदा… ☆
त्या दिवशी तुला पावसात
भिजताना पाहीलं.. अन्
वाटलं…
माझ जसं
पावसाशी नातं आहे
तसंच तुझ आणि पावसाच
आहे की काय….
पण आज तुला
पावसात छत्री घेऊन
येताना पाहीलं
तेव्हा खात्री झाली…
माझ्यासारख तुझ पावसाशी
काहीच नातं नाही
कारण….
त्याच्यात आणि माझ्यात
कधी
कोणता आड पडदाच
येत नाही…!
© सुजित शिवाजी कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६