श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “प्रीतिचा झरा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 66 ☆
☆ प्रीतिचा झरा ☆
डावी खिडकी हृदयाची या उघडायाला हवी
शुद्ध येईल हवा प्रीतिची तेव्हा हृदयी नवी
शृंगाराचा ऐवज माझा मी तर आहे परी
सुरूंग लावू आभाळाला बरसतील या सरी
चिरून घेते हृदय कोवळे फाळाकडुनी धरा
पाटामधुनी वहात आहे कसा प्रीतिचा झरा
अंधाराचे राज्य संपले वाटतोस तू रवी
प्रकाश किरणें मला खुलवती साथ तुझी रे हवी
असे गीत हे गाऊ आपण असेल त्याला गती
तुझ्या नि माझ्या मधे यायला नको कधीही यती
प्रीत सागरा नसे किनारा अधी वाटले बला
सहज पोहून गेलो नंतर छान वाटली कला
जमवू काड्या बांधू घरटे घरात लावू दिवा
कुणी तरी हा पुढे वारसा सांभाळाया हवा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
शेवट फारच सुंदर.
मनाला भिडणारे काव्य!!!