श्री शेखर किसनराव पालखे
☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 9 ☆
☆ शब्दांचं नातं हळुवार ☆
शब्द -एक आविष्कार
शब्द -एक नवं हत्यार
शब्द म्हणजे एक वार
शब्द म्हणजे तलवार
शब्द करतो काळजावर घाव
शब्दच म्हणतो माझं मलम लाव
शब्द घडवतो बिघडवतो
शब्द लढवतो, भांडतो, मारतो
शब्द जगायलाही शिकवतो
शब्द असा-शब्द तसा
कसा?-तर वापराल जसा
शब्द तोलतात शहाणपण
शब्द खोलतात गाढवपण
शब्द करतो बदनाम
मुक्या जनावरांनाही
राग येतो माणसांना
कुत्रा प्रामाणिक असतो तरीही
म्हणून म्हणतो शब्दांनो तुम्हीच
वेळेवर शहाणे व्हा
माझ्यातल्या शब्दवेड्याला
शहाणपणाचं भान द्या
© शेखर किसनराव पालखे
पुणे
07/06/20
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
अजब शब्दायन.