सुजित शिवाजी कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #57 ☆
☆ आपसुक…! ☆
तुझ्या माझ्यातला पाऊस
आता पहिल्यासारखा
राहिला नाही… . .
तुझ्या सोबत जसा
पावसात भिजायचो ना
तसं पावसात भिजणं
होत नाही
आता फक्त
मी पाऊस
नजरेत साठवतो…
आणि तो ही ;
तुझी आठवण आली की
आपसुकच गालावर ओघळतो.
तुझं ही काहीसं
असंच होत असेल
खात्री आहे मला . . .
तुझ्याही गालावर
नकळत का होईना
पाऊस ओघळत असेल…!
© सुजित शिवाजी कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
वाह!!! पाऊस गालावर ओघळतो!!! खुपच छान सुजित!!!