(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी एक ऐसी कविता जो वर्तमान पीढ़ी की प्रत्येक सास अपनी बहू के लिए मन ही मन लिखती होंगी । किन्तु , प्रत्यक्ष में कोई प्रदर्शित कर पाती हैं और कोई नहीं कर पाती । कभी अहंकार (Ego) आड़े आ जाता है तो कभी कुछ। आपकी कविता में बहू ही नहीं बेटी का स्वरूप भी दिखाई देता है। सुश्री प्रभा जी को निश्चित रूप से ऐसे उत्कृष्ट साहित्य के लिए साधुवाद और उनकी लेखनी को नमन।
सास और बहू के रिश्तों पर उनकी भावना उनके ही शब्दों में –
“ सासू सुनेचं नातं युगानुयुगे वादग्रस्तच ठरलेलं आहे……माझ्या सूनेबद्दल च्या भावना व्यक्त करणारी कविता….
आजच्या #कवितेच्या प्रदेशात मध्ये! ” – प्रभा सोनवणे
अब आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं । )
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 5 ☆
☆ मला वाटते …..☆
ती खरोखर सुंदर आहे
आणि आवडतेही मला मनापासून !
ती दिसते अधिक आकर्षक आणि गोड
चुडीदार ,पंजाबीड्रेस मध्येच !
पैठणीत ही दिसते खुलून …….
पण मला वाटते ,
तिने क्वचितच नेसावी साडी ,
मात्र जीन्स वापरावी सर्रास ,
जावे ट्रेकिंगला ,
करावी मुलुखगिरी !
आयुष्यातले सारे सारे आनंद
लुटावेत मनसोक्त !
स्वयंपाक ही करावा चटपटीत -चटकदार ,
हवा तसा हवा तेंव्हा !!
मला आवडते तिचे सफाईदार ड्राईव्हिंग ,
आणि फर्डा इंग्रजी संभाषणही .
मिळालेल्या स्वातंत्र्यातून आणि संधीतून
बनावे तिने स्वयंसिद्ध ,स्वयंपूर्ण !
तिच्यात दिसते मला नेहमीच
एक हरणाचे पाडस ,
जंगलात हरविलेले ……….
पण क्वचितच कधीतरी ………
तिच्यात एक मांजरही संचारते ,
फिस्कारते अधून मधून ,
न बोचकारता ,
रक्तबंबाळही करते ………
पण ….पण …..तिच्यातले ते निरागस ,
टपो-या डोळ्याचे ,चकचकीत कांतीचे .
हरिणाचे पाडसच
बागडत असते आस पास !!
………तिच्या तिच्या अभयारण्यात
असावे ते सुखरुप …..आनंदी !
ती खरोखर सुंदर आहे ,
आणि आवडतेही मला ,
मनापासून …………..
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503
सुंदर कविता, सुंदर विचार. काही चांगल्या गोष्टी, भावना स्वतःला अनुभवता आल्या नाही तरी, मन प्रांजळ असलं’ इच्छा उत्कट असली की ‘आपल्या’ माणसाच्या रूपातही त्या अनुभवता येतात – हे उमजवून देणारी कविता वाटली. सुनेला किती सुंदर सदिच्छा आहेत!
धन्यवाद
सुंदर कविता मनापासून आवडली.
धन्यवाद
धन्यवाद
खूप छान विचार मांडले आहेत. अशी सून नशिबवान! सद्य परिस्थितीत आपले विचार खूप भावले. अशी विचारसरणी नाती सुदृढ करायला मदत करते. आपल्या विचारांचे मनापासून स्वागत! खूप छान
धन्यवाद ?
धन्यवाद!