सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 70 ☆
☆ कोजागरी ☆
ही कोजागरी येईल निश्चितच,
एक नवी आशा घेऊन!
मी नव्याने ओळखू लागले आहे,
तुझ्या मनातलं टिपूर चांदणं,
“अतिपरिचयात अवज्ञा”
म्हणतात तसंच झालं होतं—-
आपलं नातं!
समांतर रेषेसारखं जगत राहीलो,
एका छताखाली!
पण ही पौर्णिमा आणि
कोजागरी चा चंद्र,
घडवणार आहे नवा इतिहास….
सारी किल्मिषं निघून जातील….
त्या चांदणधारेत!
ही कोजागरी निश्चितच वेगळी आहे आपल्या दोघांसाठी!
मी बनण्याचा प्रयत्न करेन,
तुझ्या मनातल्या प्रतिमेसारखी!
पण तूही किंचीत बदलायला हवं ना?
या चांदण्या रात्रीच्या साक्षीने!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुप्रभात सर, धन्यवाद ?
खूप छान कविता.
पण ही पौर्णिमा…….सारी किल्मिष..या ओळी वाचल्यावर आठवल्या ओळी”तुम जो कह दो तो
चाॅ द डुबेगा नही,रात को रोक दूॅ”(ऑंधी)
धन्यवाद सुहासजी ! खुप सुंदर प्रतिसाद!