श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 70 ☆
☆ छोटे छोटे वऱ्हाडी .. ☆
घरी चार बाहुल्या करी टिवल्याबावल्या
भातुकलीच्या खेळात खोटं खोटं जेवल्या
छोटी होती चूल त्यावर शिजवला भात
छोट्याशा बाहुल्यानं मारला आडवा हात
भात खाऊन बाहुला देतो मोठी ढेकर
घरी नव्हतं पीठ केली मातीची भाकर
साखर देऊन थोडीशी आई म्हणे खेळा
निरोप नव्हता मुंग्यांना तरी झाल्या गोळा
नकट्या ह्या बाहुलीचं ठरलं होतं लग्न
काय सांगू लग्नातमध्ये सतराशे विघ्न
बाहुला हा शिकलेला नव्हता काही शाळा
तरीसुद्धा मागत होता सोनं एक तोळा
नकटीच्या लग्नामध्ये कमी पडले लाडू
छोटे छोटे वऱ्हाडी हे लागले होते रडू
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
झक्कास लागलं लग्न.