श्री शेखर किसनराव पालखे
☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 13 ☆
☆ ग़ज़ल ☆
शेवटी शेवटाचा खेळ सुरू जाहला
खरेपणाने मांडलेला डाव झुरु लागला
रमावे तरी किती जुन्याआठवांमधे
कि ‘त्या’ची चाहूल लागली आहे मला?
समाधानी जीव हा व्हायचा परंतु
न कळे असा हा कसा घात झाला?
रात्र ही काळी संपली नाही अजुनी
वर्षाव तारकांचा का मधेच थांबला?
पाहता मागे वळूनी हे नेत्र वाहिलेले
लगेच भावनांचा का बांध फुटू लागला?
खेळ शेवटाचा मग पुन्हा सुरू जाहला
सावराया आता वेळ नुरू लागला
तारून न्यावी कशी ही नौका पैलतीराला
रात्रंदिन लागे ही काळजी जीवाला.
© शेखर किसनराव पालखे
सतारा
17/05/20
(टीप: गजल की प्रत्येक पंक्तियों के पहले अक्षर से रचनाकार का नाम शेखर किसनराव पालखे सतारा बनता है। )
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈