सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 75 ☆
☆ बालमैत्रीण ☆
मला याद येते जुन्या त्या दिनांची
तिच्या भोवती नित्य झेपावण्याची
सखी दूर गेली कशी काय आता
तिथे एक होता जिवाला विसावा
घराचे घराशी असे काय नाते
तिचे मैत्र वाटे जिवीच्या जिवाचे
तिथे त्या घराशी उभी एक जाई
तशी माय वाटे मला पूर्ण आई
किती स्वच्छ होती घरे अंगणेही
कुणी ना कुणाला उगा मात देती
मनाला मुभा नित्य संचारण्याची
स्वतःला स्वतःशी तिथे भेटण्याची
सखे मैत्रिणी मी तुला काय देवू
जुन्या आठवांना नको हात लावू
मनीमानसी मी तुला पांघरावे
युगान्ती वसावे तसेही जगावे
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
धन्यवाद हेमंतजी!
सर मै आपकी आभारी हूँ ।