श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 57 – अभंग – अहंकार ☆
सोडी अहंकार
व्यर्थ बडीवार
मिरविशी फार
सदोदीत…./१/
प्रसिद्धीची हाव
वृथा धावाधाव
मनाचा घे ठाव
थांब थोडा……/२/
अहंभाव वारे
शिरताच कानी
बुद्धी मनमानी
करितसे…./३/
अपुऱ्या ज्ञानाचे
उगा प्रदर्शन
अज्ञान दर्शन
जगतास…./४/
योग्यतेची जाण
कुवतीचे भान
ज्ञानियांचा मान
चित्ती हवा …./५/
ज्ञानार्जन ध्यास
प्रयत्नांची कास
सचोटी विश्वास
अंगी बाण…./६/
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈