श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 84 ☆
☆ तडा गेला आकाशाला ☆
आठवांचा हा पसारा
आहे फक्त सोबतीला
नव्या स्वप्नांच्या शोधात
मित्र परदेशी गेला
कधी मस्त भांडायचो
उरावर बसायचो
वैरभावाचा हा रंग
नाही कधी जोपासला
चिंचा झाडाच्या पाडून
सारे घ्यायचो वाटून
अशी धूम ठोकायचो
माळी येता धरायला
गनी शेख, गणेशास
गण्या म्हणती दोघास
जात धर्माचा पगडा
नाही मैत्रीमधे आला
वैरी होत गेला काळ
आणि तुटली ही नाळ
सारी पाखरे पांगली
तडा गेला आकाशाला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈