मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #4 – भूक…. ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

(स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   चतुर्थ कड़ी  भूक …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )

(e-abhivyakti की ओर से सुश्री आरूशी दाते जी का ‘काव्यानन्द प्रतिष्ठान, पुणे’ की ओर से विश्व महिला दिवस पर आयोजित काव्य प्रतिस्पर्धा में प्रथम स्थान प्राप्त करने के उपलक्ष में हार्दिक अभिनंदन।)  

 

? मी_माझी  – #4 – भूक …? 

 

भूक हा शब्दच अनेक उलाढाली घडवून आणायला कारणीभूत ठरतो… हो ना!
शाळेत गेलं की आईने डब्यात काय दिलं असेल? किंवा घरी पोचल्यावर आई खायला काय देईल? हे विचार कायम ऑन असतात,

कशासाठी ? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी !
कमवतो कशाला? पोट भरण्यासाठीच ना !

पोट भरण्यासाठी की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ?

इथे खरी गोम आहे, नाही का !

चमचमीत खायला मिळालं पाहिजे… माझा भाऊ नेहमी म्हणतो, तळीचा आत्माराम शांत झाला पाहिजे… !

सगळी धावपळ, अट्टाहास ह्याच साठी…

theoretically speaking, ह्याने पोटातली भूक भागते, बाकीच्या भुका आहेत, त्यांचं काय ? बाकीच्या म्हणजे काय हे कळलं नाही ना?

वैचारिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक… अहो, इतकंच काय, फेसबुक / व्हाट्सअप्प भूक, वगैरे, वगैरे… माणसाचं आयुष्य समृद्ध करण्यात ह्या सगळ्यांचा हातभार आवशयक आहे…

आता आठवलं न, बरोबर !

आता लक्षात ठेवा आणि मग बघू या प्रत्येक भूक कशी शमवता येते ते, चालेल ना!

बोलू या ह्या विषयावर, लवकरच !

© आरुशी दाते